शंखनाद अन् योगसाधनेचा आज अनुभव घेण्याची संधी

शंखनाद अन् योगसाधनेचा
आज अनुभव घेण्याची संधी
Published on: 

पुणे, ता. १४ : भारतीय संस्कृती आणि परंपरेत शंखाला विशेष महत्त्व असून, त्याच्या ध्वनीला पवित्र मानले जाते. शंखनाद आणि श्वसनाचा सराव यांचा संबंध समजून घेण्यासाठी तसेच शंख साधनेचे तंत्र प्रत्यक्ष शिकण्यासाठी शनिवारी (ता. १४) विशेष कार्यशाळेचे आयोजन केले आहे. शंख साधनेमुळे श्वासोच्छ्वासाचा कालावधी वाढवण्यास आणि श्वसनावर नियंत्रण मिळवण्यास मदत होते, असा अभ्यासकांचा अनुभव आहे. योगसाधना करणाऱ्यांसाठीही शंखनादाचा सराव उपयुक्त मानला जातो. मुली आणि महिलांनाही ही साधना करता येते. शंख साधनेचे स्वरूप, तिचा नियमित सराव आणि त्यामागील पारंपरिक संकल्पना यांची माहिती कार्यशाळेत दिली जाणार आहे. यामध्ये शंख आणि सनातन धर्मातील त्याचे स्थान, शंखाचे विविध प्रकार, त्याची नैसर्गिक निर्मिती, शंखनादाचे महत्त्व तसेच शरीर आणि योग यांच्यातील संबंधांवर मार्गदर्शन केले जाईल.
संपर्क : ८४८४८११५४४, ८४८४८२२१६६

स्क्रिप्ट रायटिंग अन्
स्क्रीनप्ले रायटिंग कार्यशाळा
चित्रपटासाठी कल्पनेचे प्रभावी कथेत आणि कथेचे पटकथेत रूपांतर करण्याचे तंत्र शिकवणारी ‘स्क्रिप्ट रायटिंग आणि स्क्रीनप्ले रायटिंग’ ही तीन दिवसीय विशेष कार्यशाळा १६, १७ व १८ नोव्हेंबरला आयोजित केली आहे. यात चित्रपट निर्मितीची प्रक्रिया, आशय निर्मिती, कथेचा विकास, सिनेमॅटिक दृश्यभाषा, स्क्रीनप्लेची रचना, प्रसंगांची मांडणी, व्यक्तिरेखांची जडणघडण आणि थ्री-ॲक्ट स्ट्रक्चर यांविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच प्रात्यक्षिके आणि असाइनमेंटच्या माध्यमातून प्रत्यक्ष पटकथा लेखनाचा सराव करून घेतला जाईल. विद्यार्थी, शॉर्ट फिल्म निर्माते, सहायक दिग्दर्शक तसेच चित्रपट क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४, ८४८४८२२१६६

प्लॉटिंग व्यवसायात
करिअरच्या संधी
रिअल इस्टेट क्षेत्रात प्लॉटिंग व्यवसाय सुरू करू इच्छिणारे, जमीन गुंतवणूकदार तसेच नवोदित उद्योजकांसाठी दोन दिवसीय लँड डेव्हलपमेंट (प्लॉटिंग) व्यवसाय प्रशिक्षण २१ व २२ नोव्हेंबरला आयोजिले आहे. प्लॉटिंग व्यवसायाची प्रक्रिया प्रत्यक्ष उदाहरणांसह समजावून सांगण्यावर या प्रशिक्षणात भर दिला जाणार आहे. प्रशिक्षणामध्ये योग्य जमीन कशी शोधावी, तिची कायदेशीर पडताळणी कशी करावी, खरेदी-विक्री व्यवहार सुरक्षितरीत्या कसे पूर्ण करावेत, तसेच जमीनमालकांशी प्रभावी संवाद साधण्याचे तंत्र याविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. याशिवाय टाऊन प्लॅनिंग, प्लॉटिंगची विकास प्रक्रिया, प्रकल्प नियोजन, विक्री व विपणन कौशल्ये, गुंतवणूकदार आणि ग्राहक व्यवस्थापन तसेच व्यवसाय विस्तारासाठी आवश्यक धोरणांबाबत मार्गदर्शन मिळणार आहे.
संपर्क : ८४८४८२२८५५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.