CSIR च्या १२ वैज्ञानिकांना 'शांतिस्वरूप भटनागर' पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 सप्टेंबर 2019

पुणे : भारतातील 'नोबेल' समजल्या जाणाऱ्या 'शांतिस्वरूप भटनागर' पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन संस्थेच्या (Council of Scientific and Industrial Research ) वतीने नुकतेच हे पुरस्कार जाहीर करण्यात आले. देशाच्या वैज्ञानिक क्षेत्रामध्ये प्रतिष्ठेचा समाजाला जाणारा हा पुरस्कार आहे. 

२०१९ या वर्षासाठी १२ वैज्ञानिकांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (IISER) येथील प्रा.कायरट साईकृष्णन, तसेच प्रा. सोमण बासक, प्रा. राघवन सुनोज, प्रा. तपसकुमार माजी, प्रा. सुबिमल घोष, डॉ. माणिक वर्मा, प्रा. दिशांत पांचोळी, डॉ. नीना गुप्ता, डॉ. धीरज कुमार, डॉ. मोहम्मद जावेद अली, प्रा. अनिंदा सिन्हा, प्रा.शंकर घोष यांचा समावेश आहे.

पुरस्कारार्थीमध्ये आयसर कोलकात्याच्या एकमेव महिला शास्त्रज्ञ आहेत. पुरस्काराचे स्वरूप ५ लाख रुपये रोख आणि १५ हजार रुपये दरमहा मानधन असे आहे. CSIR च्या स्थापनादिनी २६ सप्टेंबरला पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shanti Swarup Bhatnagar Award declared for 12 CSIR scientists