
मंचर : “ शरद बँकेने ५२ वर्षाच्या इतिहासात प्रथमता निव्वळ एन पी ए. प्रमाण शून्य टक्के ठेवले आहे. एकूण एक हजार ८६६ कोटी १५ लाख रुपये ठेवीचा टप्पा ओलांडला आहे.येत्या दोन वर्षात पाच हजार कोटी ठेवीचा टप्पा पूर्ण करण्याचे उदिष्ट आहे. बँकिंग क्षेत्रात भारतात शरद बँकेचा ४० वा क्रमांक आला असून बँकेने क्यूआर कोड प्रणाली लागू केल्यामुळे घर बसल्या ग्राहकांना डिजिटल पद्धतीने आर्थिक व्यवहार करता येईल ”.असे शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांनी सांगितले.