

Former BJP Leader Sharad Buttepatil Returns to NCP
Sakal
आंबेठाण : उत्तर पुणे जिल्हा भाजपचे माजी अध्यक्ष आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती शरद बुट्टेपाटील हे उद्या ( दि.१९ ) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ( अजित पवार ) प्रवेश करणार आहेत.बुट्टेपाटलांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने उत्तर पुणे जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का बसणार आहे. तब्बल बारा वर्षानंतर ते पुन्हा स्वगृही परतत आहेत.