
आंबेठाण : खेड तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांची केलेली रचना ही निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमाला डावलून अतिशय चुकीच्या पद्धतीने करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू झाल्यापासून आतापर्यंतच्या इतिहासात कधीही अशी रचना झाली नव्हती, अशी विचित्र रचना करण्यात आली आहे.