
आंबेठाण : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने ७५ मीटर रुंदीचा रस्ता पुणे-नाशिक महामार्गापर्यंत तात्काळ मार्गी लावावा. चाकण-वासुली फाटा रस्त्यावर सकाळी सात ते संध्याकाळी सातपर्यंत अवजड वाहतूक बंद करावी आणि वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणी वाहतूक नियमनासाठी कर्मचारी नेमावे अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टेपाटील यांनी एमआयडीसीकडे केली आहे. तसेच जर पुढील दहा दिवसांत यावर कार्यवाही केली नाही तर नागरिक रस्त्यावर उतरतील असा इशारा देखील बुट्टेपाटील यांनी दिलेल्या निवेदनात दिला आहे.