Pune Crime : आरोपींची भूमिका गौण असल्याचा दावा दिशाभूल करणारा, शरद मोहोळ खून प्रकरणात सरकार पक्षाचा युक्तिवाद; चार आरोपींचा जामिनासाठी अर्ज

Sharad Mohol murder case : शरद मोहोळ खून प्रकरणात चार आरोपींच्या जामीन अर्जाला सरकार पक्षाने तीव्र विरोध केला. विशेष सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत यांनी गुन्हा पूर्वनियोजित व संघटित असल्याचा दावा केला. पुढील सुनावणी सात मार्चला होणार आहे.
Sharad Mohol murder case

Sharad Mohol murder case

sakal

Updated on

पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळच्या हत्येचा गुन्हा पूर्वनियोजित असून संघटित पद्धतीने रचण्यात आला आहे. आरोपींनी एकत्र येऊन थंड डोक्याने कट रचून हत्या केली असल्याचे प्रथमदर्शनी तपासातून स्पष्ट होते. त्यामुळे आरोपींची भूमिका केवळ गौण असल्याचा दावा हा दिशाभूल करणारा आहे, असा युक्तिवाद सरकार पक्षाकडून करण्यात आला.

मोहोळ खून प्रकरणात चार आरोपींच्या जामीन अर्जावर न्यायालयात सुनावणी झाली. आरोपी नितीन खैरे, आदित्य गोळे, अभिजित मानकर आणि ॲड. संजय उडान यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जांना राज्य सरकार तसेच मुख्य तक्रारदारांच्या वतीने तीव्र विरोध करण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com