
बारामती : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवरील ज्ञान प्राप्त होईल या दृष्टीने आर्टिफिशियल इंटेलिजेन्सचे सेंटर ऑफ एक्स्लेन्स बारामतीत सुरु केले आहे, एआयच्या बाबतीत बारामतीचे नाव या मुळे जागतिक नकाशावर जाणार आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले.