माळेगाव - माळेगाव सहकारी साखर कारखाना माझ्या नावाने ओळखला जातो. या निवडणुकीत आमची टोकाची भूमिका घ्यायची इच्छा नव्हती आणि आजही नाही. सोबत घ्यायचा दृष्टिकोन ठेवला असता तर स्वतंत्र लढण्याची परिस्थिती आली नसती, अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवारांनी यांनी अजित पवार यांचे नाव न घेता नाराजी व्यक्त केली.