Rally organized to campaign for Maha Vikas Aghadi candidates Graduates and Teachers Constituencies Election
sakal
पुणे - हर्षदाला मी गेल्या अनेक वर्षांपासून ओळखतो. मागील दहा-बारा वर्षांपासून ती समाजकारणात व राजकारणात सक्रीय आहे. राजकारणाची जाण, भविष्याचा वेध घेण्याची क्षमता मला तिच्यात दिसून येते. पुरोगामी विचारांचा वारसा ती सक्षमपणे चालवेल याची मला खात्री आहे. उत्कृष्ट माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्यामुळे तिला समाजकारणाची ओढ लागली आहे. पदवीधरांचे प्रश्न ती विधिमंडळात प्रभावीपणे मांडेल. महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार बहुमताने विजयी होतील असा मला विश्वास आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले.