फुलशेती शेतकऱ्यांतर्फे शरद पवार यांना निवेदन

फुलशेती शेतकऱ्यांतर्फे
शरद पवार यांना निवेदन
Published on

पवनानगर, ता. २० : राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांमुळे फुलशेती शेतकऱ्यांसमोर निर्माण होणाऱ्या संभाव्य अडचणींबाबत पवना संस्कृती फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या शिष्टमंडळाने ज्येष्ठ नेते शरद पवार यांची नुकतीच भेट घेतली.
मुकुंद ठाकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सुधारित तरतुदी, त्यांची सुरू झालेली अंमलबजावणी तसेच ‘कुटुंब’ या व्याख्येतील बदलांमुळे उच्च तंत्रज्ञानाधारित फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर होणाऱ्या संभाव्य परिणामांची माहिती पवार यांना दिली. विविध मागण्या व अडचणींबाबतचे निवेदनही शरद पवार यांना देण्यात आले. कृषिमंत्री म्हणून असलेल्या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर पवार यांनी विविध बाबी समजून घेतल्या.
शेतकऱ्यांच्या हितासाठी या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी स्वतः चर्चा करून पाठपुरावा करण्याचे आश्वासन शरद पवार यांनी दिले. त्यामुळे शेतकऱ्यांनी उपस्थित केलेले प्रश्न केंद्रस्तरावर मांडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
चर्चेदरम्यान प्लास्टिक फुलांवरील बंदीच्या अंमलबजावणीचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला. हा निर्णय शेतकरी हिताचा असूनही प्रभावी अंमलबजावणी होत नाही. यासाठी सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
पवना फुल उत्पादक संघाचे अध्यक्ष मुकुंद ठाकर यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळात राजेश दळवी, बुधाजी जागेश्वर, भिकाजी भागवत, तेजोमय घाडगे, तुषार अग्रवाल आणि परमेश्वर तौर यांचा समावेश होता.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com