
पुणे : "राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हे दोन्ही पक्ष एकत्र आल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. त्याबाबतचा निर्णय सुप्रिया सुळे यांनी घ्यावा. दोन्हीकडील प्रतिनिधी हे एकाच विचाराचे आहेत. मात्र मी आता या प्रक्रियेमध्ये नाही.' असे मोठा गौप्यस्फोट राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी पत्रकारांशी झालेल्या अनौपचारिक गप्पांवेळी केला. अनौपचारिक गप्पांमधील पवार यांच्या या वक्तव्यावरून महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची आता जोरदार चर्चा सुरु झाली आहे.