
पुणे : ‘वडिलांकडून मिळालेला सशस्त्र क्रांतीचा वारसा डॉ. श्रीपाल सबनीस लेखनातून पुढे नेत आहेत. त्यांच्या लेखनात शोषित, पीडित आणि वंचितांच्या वेदनांना वाचा फुटताना दिसते. नव्या युगाच्या आशाही ते पेरत असतात, असे गौरवोद््गार ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काढले.