Vidhan Sabha 2019 : कोथरूडमध्ये पवारांनी घातले लक्ष; चंद्रकांत पाटलांचे काय होणार

विनायक बेदरकर  
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

कोथरूड मतदार संघातून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात विरोधकांची एकजूट करून सर्वमान्य एकच उमेदवार दिला जावा. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे यांचा पाठिंबा मिळवून चंद्रकांत दादा पाटील यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याची तयारी मोकाटे यांनी केली आहे.

पुणे : कोथरूड मतदारसंघातून बंडाचा झेंडा फडकवणाऱ्या शिवसेनेच्या माजी आमदार चंद्रकांत मोकाटे त्यांनी तुर्तास वेट अँड वॉच ची भूमिका घेतली आहे राष्ट्रवादी आणि मनसे यांच्यातील पाठिंब्याच्या सहमती नंतर मोकाटे यांचा निर्णय होण्याची शक्यता आहे. कोथरूड मतदारसंघात स्वतः शरद पवार यांनी लक्ष घातले असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे.

कोथरूड मतदार संघातून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात विरोधकांची एकजूट करून सर्वमान्य एकच उमेदवार दिला जावा. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे यांचा पाठिंबा मिळवून चंद्रकांत दादा पाटील यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याची तयारी मोकाटे यांनी केली आहे.

‎मात्र तुर्तास त्यांनी वेट अँड वॉच ची भूमिका घेतली आहे याला कारणही तसेच आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोकाटे यांच्या भूमिकेला सहमती दर्शवली पाहिजे.जोपर्यंत पवार आणि राज ठाकरे हे विरोधकांचा एक उमेदवार म्हणून चंद्रकांत मोकाटे यांच्या नावाला सहमती देत नाहीत तोपर्यंत मोकाटे यांचा बंडखोरी करून चंद्रकांत पाटील यांचे विरोधात लढण्याचा निर्णय हा गुलदस्त्यात राहणार आहे अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

‎याबाबत अधिक माहिती अशी, की स्वतः शरद पवार कोथरूड मतदारसंघात लक्ष घालत असून या मतदारसंघात कोण उमेदवार द्यायचा आणि तो कोणत्या पक्षाचा द्यायचा कि मोकाटे यांना अपक्ष म्हणून पाठिंबा द्यायचा. याबाबत पवार आणि राज ठाकरे यांच्यामध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Pawar looking after Kothrud constituency personally before Maharashtra Vidhan Sabha 2019