esakal | बारामतीकरांच्या मदतीला पुन्हा एकदा शरद पवार धावून आले 
sakal

बोलून बातमी शोधा

बारामतीकरांच्या मदतीला पुन्हा एकदा शरद पवार धावून आले 

कोरोना रुग्णांची संख्या अचानकच वाढल्यामुळे बारामतीत गेल्या दोन दिवसांपासून रेमडीसेव्हर इंजेक्शनचा कमालीचा तुटवडा भासत होता.

बारामतीकरांच्या मदतीला पुन्हा एकदा शरद पवार धावून आले 

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती : कोरोना रुग्णांची संख्या अचानकच वाढल्यामुळे बारामतीत गेल्या दोन दिवसांपासून रेमडीसेव्हर इंजेक्शनचा कमालीचा तुटवडा भासत होता. कालपासून तर अजिबातच रेमडीसेव्हर मिळत नाही ही बाब लक्षात घेत स्वत: ज्येष्ठ नेते शरद पवार हेच खुद्द बारामतीकरांच्या मदतीला धावून आले. आज बारामतीत पवार यांनी तब्बल 480 इंजेक्शन्स विनामूल्य वितरीत करत बारामतीकरांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. एकीकडे या इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याच्या बातम्या येत होत्या.

बारामतीतही रुग्णांच्या नातेवाईकांनाही हे इंजेक्शन मिळविण्यासाठी धावाधाव करावी लागत होती. आज अजित पवार यांनी शरद पवार यांच्याकडून आलेल्या 480 इंजेक्शन्सचे वाटप करण्याचे निर्देश दिले. 

आज प्राधान्यक्रम ठरवून ज्यांचा स्कोअर जास्त आहे, ज्यांना तातडीने गरज आहे, वयोवृध्द व महिला अशा पध्दतीने ही इंजेक्शन्स विनामूल्य वाटण्यात आली. बारामतीकरांना या इंजेक्शन्सचा तुटवडा भासू नये, या उददेशाने कोरोना सुरू झाल्यापासूनच शरद पवार यांनी अनेकदा ही इंजेक्शन्स उपलब्ध करून दिली आहेत. आजही बारामतीतील अनेक रुग्णांना या इंजेक्शन्समुळे दिलासा मिळाला.

loading image