
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन गटांमध्ये फाटाफूट झाल्यानंतर प्रथमच पक्षाचे संस्थापक शरद पवार यांनी दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्याची शक्यता सूचित केली आहे. त्यांच्या अलीकडील एका मुलाखतीत त्यांनी म्हटले की, “राष्ट्रवादीत दोन मतप्रवाह आहेत,” या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.