
पुणे : ‘‘महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांचे स्त्रीशिक्षण, शेती, सामाजिक काम, शैक्षणिक काम, उद्योग यात मोठे योगदान आहे. देशात आणि विशेषतः महाराष्ट्रात विशिष्ट सामाजिक वातावरण तयार होत आहे. नव्या पिढीत वैचारिक स्पष्टता येण्यासाठी फुले दांपत्याचे काम आदर्श ठरेल,’’ असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी केले. तसेच जोतिबा आणि सावित्रीबाई यांचा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाणे गरजेचे आहे,’’ असेही पवार म्हणाले.