Pune Politics : बंडखोर नक्की कोणाचा करणार गेम? माघारीसाठी सर्वच पक्षाचे नेते लागले कामाला!

Pune Politics : बंडखोर नक्की कोणाचा करणार गेम? माघारीसाठी सर्वच पक्षाचे नेते लागले कामाला!

Pune Politics: शहर, जिल्हा आणि पिंपरी-चिंचवडमधील विधानसभा मतदारसंघांत सर्वच पक्षांना बंडखोरीने ग्रासले आहे.
Published on

Pune: शहर, जिल्हा आणि पिंपरी-चिंचवडमधील विधानसभा मतदारसंघांत सर्वच पक्षांना बंडखोरीने ग्रासले आहे. त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न पक्षाच्या नेत्यांकडून सुरू झाले आहेत. ‘ही निवडणूक आपल्यासाठी अवघड आहे, तुम्ही अर्ज मागे घ्या, पक्ष आपल्याला न्याय देईल’, अशी आश्‍वासने बंडखोरांना दिली जात आहेत; पण ‘अनेक वर्षांत काही मिळाले नाही, निवडणूक लढविणारच’, असा प्रतिवाद बंडखोर करत आहेत. त्यामुळे सोमवारपर्यंत (ता. ४) किती बंडखोर माघार घेणार?, याकडे लक्ष लागले आहे.
पुणे जिल्ह्यात २१ विधानसभा मतदारसंघ आहेत, त्यापैकी बारामती आणि वडगाव शेरी मतदारसंघ सोडता उर्वरित १९ मतदारसंघांत ५० पेक्षा जास्त बंडखोरांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. पुरंदर, भोर, इंदापूर, मावळ, खेड, आंबेगाव, जुन्नर, पर्वती, कसबा, शिवाजीनगर, शिरूर या मतदारसंघांत महाविकास आघाडी व महायुतीतील मातब्बर इच्छुकांनी बंडखोरी केली आहे. त्यांचे अर्ज छाननीमध्येही पात्र ठरलेले आहेत. त्यामुळे त्यांचे अर्ज मागे घेण्यासाठी आता पक्षाच्या नेत्यांची धावपळ सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com