राष्ट्रवादीला मिळालेलं ज्यादाचं मत 'मविआ'चं नाही, शरद पवारांनी उघडले पत्ते

Ajit Pawar-Sharad Pawar
Ajit Pawar-Sharad Pawaresakal

महाराष्ट्रात राज्यसभा निवडणुका पार पडल्या. भाजप आणि सत्ताधारी यांनी केलेल्या मागण्यांमुळे ऐनवेळी मतमोजणी पुढे ढकलण्यात आली. मध्यरात्री निवडणूक आयोगाचा निर्णय आल्यानंतर मतमोजणी सुरू झाली. यामध्ये पहिला फटका शिवसेनेला बसला. सेनेचे आमदार सुहास कांदे यांचं मत बाद ठरवण्यात आलं. एकूण 284 मतांवर दिल्लीचा रस्ता ठरवण्यात आला.

मात्र, संपूर्ण निकाल लागल्यानंतर मविआची 10 मतं फुटल्याचं स्पष्ट झालं. आणि धनंजय महाडिक यांनी विजय मिळवला. यावर शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आज सकाळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि आमदार रोहित पवार यांनी पवारांची पुण्यात भेट घेतली. यानंतर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. फडणवीस यांना लोकांना आपलेसं करण्यात यश आलं. मात्र, अपक्षांच्या मतांमध्ये गंमती झालेल्या आहेत, असं शरद पवार म्हणाले. आघाडीची मतं फुटली नाही, तर ती फडणवीसांनी वेगवेगळ्या मार्गांनी वळवल्याचं वक्तव्य पवारांनी केलंय. यानंतर त्यांनी आणखी एक वक्तव्य केल्याने आता सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली होती. पटेल यांचा मतांचा कोटा पूर्ण झाल्याने त्यांचा राज्यसभेचा रस्ता सुकर झाला आहे. मात्र, शिवसेनेचा सहावा उमेदवार पडल्याने महाविकास आघाडीत नाराजीचा सूर आहे. यावर बोलताना पवारांनी पटेल यांना एक ज्यादाचं मत मिळाल्याचं सांगितलं. हे मत मविआतील नसून अन्य बाजूचं असल्याचं पवारांनी सांगितलं, आणि आता चर्चा वाढू लागल्या आहेत.

राष्ट्रवादीला आलेलं ज्यादा मत हे शिवसेना जाणार नव्हतं. आमच्या विरोधकांच्या कोट्यातील एक मत राष्ट्रवादीला आलं, असं पवार म्हणाले.

भाजपचा हा रडीचा डाव असल्याचं पवारांनी म्हटलंय. याचा मविआ सरकारवर काही फरक पडणार नाही. एखादं मतं इकडे तिकडे ज्यादा घेतलं. फार काही फरक पडला नाहीस असं पवार म्हणाले. त्यांच्यातील अनेक लोक आहेत ज्यांनी कधी काळी माझ्याबरोबर काम केलं आहे. मी शब्द टाकला तर ते नाही म्हणत नाही. पण मी त्यात पडलो नाही. एकाने मला स्वतः हून सांगितलं. आणि स्वत:हून मत दिलं.

मला या निकालाने धक्का बसलेला नाही

धक्का बसेल असा हा निकाल नाही. आम्ही रिस्क घेतली. मतांची संख्या पाहिल्यास राष्ट्रवादी काँग्रेस आणि अन्य पक्षांनाही फरक पडलेला नाही. आम्ही धाडस केलं आणि प्रयत्न केला. भाजपने आम्हाला पाठिंबा देऊ इच्छिणाऱ्या अपक्षांवर योग्य खेळी केली. याचा त्यांना फायदा झाला. जो चमत्कार झाला आहे. पण तो मान्य केला पादिहेस असं पवार म्हणाले.

फडणवीसांचं कौतुक

विविध मार्गांनी माणसं स्वतकडे वळवणं हे फडणवीसांचं जमलंय. यामध्ये फडणवीसांना यश आलं आहे, असं म्हणत पवारांनी त्यांचं कौतुक केलंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com