Sharad Pawaresakal
पुणे
Sharad Pawar: ...तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही; सुप्रिया सुळेंचा इशारा
Latest NCP News: सरकारला जाग यावी हीच या मागची भावना आहे. शरद पवार कृषीमंत्री होते तेव्हा शेतक-यांना चांगले भाव मिळत होते.
Baramati: जो पर्यंत शेतक-यांना कांदा व दूधाला दरवाढ मिळत नाही तोवर शांततामय मार्गाने आंदोलन करत राहू, मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन याच आठवड्यात भेटू, दरवाढ मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला.
कांदा व दूधाला दरवाढ मिळावी या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मंगळवारी (ता. 7) बारामतीत आंदोलन केले गेले. या प्रसंगी सुप्रिया सुळे बोलत होत्या.