शरद पवार भीमा कोरेगाव प्रकरणी आयोगासमोर देणार साक्ष

Sharad Pawar initiative for Chimani Letter viral
Sharad Pawar initiative for Chimani Letter viralSakal

पुणे: कोरेगाव भीमा प्रकरणाची चौकशी करणाऱ्या आयोगगासमोर शरद पवार हजेरी राहणार आहेत. 23 आणि 24 फेब्रुवारीला शरद पवार (Sharad Pawar) साक्ष नोंदवण्यासाठी हजर राहणार आहेत. 21 ते 25 फेब्रुवारी दरम्यान आयोगाचं कामकाज पुण्याऐवजी मुंबईत होणार आहे.

Sharad Pawar initiative for Chimani Letter viral
Nitesh Rane Bail: मोठी बातमी! नितेश राणेंना जामीन मंजूर

कोरेगांव भीमा याठिकाणी जो हिंसाचार घडला होता, त्यासंदर्भात 1 जानेवारी 2018 मध्ये काही विधाने शरद पवार (Sharad Pawar) यांनी केली होती, त्यावरुन त्यांच्याकडे काही अधिकची माहिती उपलब्ध असण्याची शक्यता आयोगाला वाटते. यापूर्वीही आयोगाने शरद पवारांना 4 एप्रिल रोजी समन्स बजावले होते. मात्र, काही कारणास्तव ते हजर राहू शकले नव्हते. त्यामुळे त्यांना आता पुन्हा समन्स बजावण्यात आले आहेत. (Koregaon Bhima)

Sharad Pawar initiative for Chimani Letter viral
वसुलीचे पैसे कोणाला दिले? चांदीवाल आयोगाला दिलेल्या अर्जात वाझेचा खुलासा

शरद पवारांनी काही विधाने केली होती, त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की, यामागे मिलींद एकबोटे आणि संभाजी भिडे यांचा हात असण्याची शक्यता आहे. त्यांच्या चिथावणीखोर वक्तव्यांनी तिथलं वातावरण बिघडलं, असं त्यांच्या विधानातून समोर आलं होतं. ते विधान माध्यमांमध्ये उपलब्ध झालं होतं. त्यामुळे या प्रकरणी त्यांची साक्ष उपलब्ध होणं महत्त्वपूर्ण वाटतं, असा अर्ज विवेक विचारमंचचे सदस्य सागर शिंदे यांनी केला होता. त्यामुळे पुन्हा एकदा या कमिटीने आयोगापुढे हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहेत. (Koregaon Bhima)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com