शरद पवार यांचा शब्द माझ्यासाठी अंतिम ः बेनके

दत्ता म्हसकर ः सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 सप्टेंबर 2019

जुन्नर विधानसभा उमेदवारीबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार जो निर्णय घेतील, तो माझ्यासाठी अंतिम राहील,'' असे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल बेनके यांनी केले.

जुन्नर (पुणे) : ""जुन्नर विधानसभा उमेदवारीबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार जो निर्णय घेतील, तो माझ्यासाठी अंतिम राहील,'' असे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल बेनके यांनी केले.

जुन्नर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसची बैठक नारायणगाव येथे शुक्रवारी (ता. 6) झाली. त्या वेळी ते बोलत होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख पदाधिकारी संजय काळे, पांडुरंग पवार, अनिलतात्या मेहेर, शरद लेंडे, अंकुश आमले, बाळासाहेब खिलारी, मोहित ढमाले, भाऊ देवाडे, दीपक औटी, अरुण मोरे, अलका फुलपगार, दिनेश दुबे, सूरज वाजगे, सुरेखा वेठेकर, राजश्री बोरकर आदी या वेळी उपस्थित होते.

जुन्नरची जागा "राष्ट्रवादी'लाच मिळावी, अशी आग्रही मागणी या वेळी करण्यात आली. राष्ट्रवादी कॉंग्रेसची तालुक्‍यात मोठी ताकद आहे. अतुल बेनके यांनी त्यासाठी खूप मेहनत घेतली आहे, अशी भावना अनेक पदाधिकाऱ्यांनी या वेळी व्यक्त केली.

संजय काळे म्हणाले, ""तालुका संघटनेने एकमुखाने अतुल बेनके यांच्या उमेदवारीची मागणी केली आहे. विधानसभेचे आघाडीचे उमेदवार अतुल बेनके हेच असतील, कार्यकर्त्यांनी विचलित होऊ नये.''

या वेळी शरद लेंडे, पांडुरंग पवार, दादाभाऊ बगाड, अनिलतात्या मेहेर, भाऊ कुंभार, तुषार थोरात, संदीप गंभीर, विजय ढामसे, अलका फुलपगार, पूजा बुट्टे आदींची भाषणे झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Pawar's word is final for me: Benke