Vidhan Sabha 2019 : 'पक्ष संघटना एकत्र ठेवण्याचे आव्हान'

sharad sonawane MLA Report  card
sharad sonawane MLA Report card

विधानसभा 2019
मनसेचे एकमेव आमदार म्हणून विजयी झाल्याने जुन्नर मतदारसंघात शरद सोनवणे यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. विविध कामांना मोठ्या प्रमाणात मंजुरी मिळविण्यात व ती सुरू करण्यात ते यशस्वी झाले. मात्र,  त्यांनी अचानक मनसेपासून फारकत घेतली आणि ‘आपला माणूस आपली आघाडी’ या राजकीय पक्षाची स्थापना केली. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. त्यानंतर त्यांनी थेट शिवसेनेत उडी मारली. मंजूर कामे सांगण्याची व पक्ष संघटना बळकट करण्याची कसरत त्यांना करावी लागणार आहे. 

५ वर्षे  - कार्यकाळ
८०% - विधानसभेतील उपस्थिती

राबविलेले प्रकल्प
  दाऱ्याघाटाचे सर्वेक्षण पूर्ण, ७५ किलोमीटर लांबीच्या अष्टविनायक मार्गाचे काम प्रगतीपथावर
 माणिकडोह धरणाचे बुडीत बंधाऱ्याचे सर्वेक्षण
 किल्ले शिवनेरीकडे जाणारा सिमेंट काँक्रीटचा रस्ता, पथदिवे, जॉगिंग पथ ही कामे पूर्ण

प्रलंबित प्रश्‍न
बिबट सफारी, पर्यटन तालुका, दाऱ्याघाट यासाठी अपेक्षित निधीच्या तरतुदी होणे आवश्‍यक
 आणे पठार भागातील एमआयडीसी कागदावरच  
 बिबट्याचा शेतकऱ्यांना व नागरिकांना  होणारा त्रास 

पर्यटन तालुका घोषित झाल्यानंतर तालुक्‍याचा डीपीआर मंजूर करून निधी उपलब्ध होईल. डिंभे ते माणिकडोह धरण बोगद्याचे काम पूर्ण झाल्यानंतर अतिरिक्त पाणी कुकडीतून लिफ्ट करून आणे पठार विभागात देण्यात येईल. शेतकऱ्यांसाठी आधुनिक शीतगृह, प्रोसेसिंग व पॅकेजिंग युनिटची उभारणी केली जातील.  
 - शरद सोनवणे, आमदार, जुन्नर


आमदारांनी खोटे बोलून जनतेला फसविण्याचे काम केले आहे. धरणग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्‍न सुटले नाहीत. प्रकल्प मंजूर झाल्याचे सांगतात, पण निधीचे काय? पाच वर्षांत दाखविता येईल, असे भरीव काम झाले नाही.
- आशा बुचके, सन २०१४ च्या प्रतिस्पर्धी उमेदवार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com