शरदचंद्र पतसंस्थेकडून अकरा टक्के लाभांश

शरदचंद्र पतसंस्थेकडून 
अकरा टक्के लाभांश
Published on

आळेफाटा, ता. १४ ः राजुरी (ता. जुन्नर) येथील शरदचंद्र नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने यावर्षी सभासदांना नियोजित अकरा टक्के लाभांशासह दीपावली भेटवस्तू देण्यात येणार असल्याची माहिती पतसंस्थेचे अध्यक्ष एम. डी. घंगाळे यांनी दिली.
शरदचंद्र पतसंस्थेची ३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा घंगाळे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात झाली. त्यावेळी ते बोलत होते. सभेसाठी पतसंस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र औटी, मानद सचिव दत्तात्रय गंधट, खजिनदार भीमाजी मालुस्कर, संस्थापक व संचालक जी. के. औटी, अनंतराव गटकळ, नरेंद्र गटकळ, तुळशीराम हाडवळे, प्रमोद पा. औटी, संजय पिंगळे, अशोकराव औटी, विवेक शेळके, संदीप औटी आदी उपस्थित होते.
पतसंस्थेचे संस्थापक संचालक जी. के. औटी यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविकात संस्थेच्या प्रगतीचा आढावा सादर केला. शरदचंद्र पतसंस्थेची स्थापना सन १९९२मध्ये झाली. पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयासह राज्यभरात १७ शाखा कार्यरत असल्याचे घंगाळे यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले, ‘‘पतसंस्थेमध्ये १९११९ सभासद आहेत. खेळते भाग भांडवल ४१७ कोटी रुपये असून वसूल भागभांडवल १९ कोटी रुपये इतके आहे. संस्थेमध्ये अहवाल वर्षात ३४० कोटी रुपयांच्या ठेवी असून कर्ज वाटप २६५ कोटी रुपये इतके झाले आहे. पतसंस्थेला अहवाल वर्षात ३ कोटी ७५ लाख ३० हजार २८८ रुपयांचा नफा झाला आहे. संस्थेला लेखा परीक्षणाचा सतत अ वर्ग प्राप्त होत असून पतसंस्था सर्व सभासद, अधिकारी व कर्मचाऱ्यांचा दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी तीन लाख रुपयांचा अपघाती विमा उतरविणार आहे.’’
यावेळी उपस्थित सभासदांसाठी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे संचालक भास्कर बांगर यांनी प्रशिक्षण दिले. सभेमध्ये विषय पत्रिकेवरील विषयांचे वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास घंगाळे यांनी केले.
प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक जी. के. औटी यांनी केले. तर सूत्रसंचालन तुळशीराम हाडवळे यांनी केले. तर आभार अनंतराव गटकळ यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com