Shasan Aplya Dari : सरकारी योजनांचा लाभ एकाच छताखाली

‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत नागरिकांना विविध सरकारी योजना आणि सेवांचा लाभ एकाच छताखाली देण्यात येणार
Shasan Aplya Dari
Shasan Aplya Dari esakal

पुणे : ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत नागरिकांना विविध सरकारी योजना आणि सेवांचा लाभ एकाच छताखाली देण्यात येणार आहे. हवेली तालुक्यातील कोंढवे धावडे येथील अंजनी लॉन्स मंगल कार्यालयात ३० मे रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमांतर्गत तहसील कार्यालय, पंचायत समितीचा आरोग्य विभाग, ग्रामपंचायत, कृषी, एकात्मिक बाल विकास, भूमिअभिलेख, पशुवैद्यकीय आदी विभागांतर्गत येणाऱ्या सर्व सरकारी योजनांचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे.

Shasan Aplya Dari
Shasan Aplya Dari : खडकवासला मतदारसंघात मंगळवारी शासन आपल्या दारी

यामध्ये शिधापत्रिका, शासकीय प्रमाणपत्र (वय, राष्ट्रीयत्व, अधिवास, उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, नॉन क्रिमीलेअर दाखला), मतदारनोंदणी, आधार नोंदणी व दुरुस्ती, संजय गांधी योजना, सलोखा योजना, प्रधानमंत्री मातृवंदन योजना, कुटुंबकल्याण योजना, जन्म मृत्यू प्रमाणपत्र, कन्या समृद्धी योजना, विवाहनोंदणी,

Shasan Aplya Dari
Pune Rain : गेल्या पावसाळ्यातून काही शिकलोय का?

कुपोषित बालकांची तपासणी, जमीनमोजणी, भूमापन, प्रॉपर्टी कार्ड, कृषी अवजारांचे वाटप, बियाणे औषध वाटप, महा डीबीटी नोंदणी, जनावरांची तपासणी शिबिर, किसान क्रेडिट कार्ड, पशुसंवर्धन प्रशिक्षण, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र, रमाई घरकुल योजना, सुकन्या समृद्धी योजना, आधार जोडणी आदी सरकारी योजनांचा समावेश आहे. हवेली तालुक्यातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन हवेलीचे उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com