
पुणे : ‘अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना गांभीर्याने घ्यायला हवे, पण त्यांच्या विधानांचा प्रत्येक वेळी शब्दशः अर्थ काढण्याची गरज नाही. ते भारताला ‘मृत अर्थव्यवस्था’ म्हणतात, तेव्हा भारताचा अपमान करणे हा ट्रंप यांचा मुख्य उद्देश असतो. मात्र राष्ट्राध्यक्षांच्या विधानांपेक्षा अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणांवर दोन देशांमधील संबंध अवलंबून आहेत.’’ असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार डॉ. शशी थरूर यांनी रविवारी व्यक्त केले.