डॉ.शशिकांत कुलकर्णी यांना पीएचडी प्रदान
NPT26B08783
शशिकांत कुलकर्णी यांना पीएच.डी. प्रदान
नातेपुते ः पुरंदावडे (ता. माळशिरस) येथील शशिकांत पुरुषोत्तम कुलकर्णी यांना दिल्ली येथील विश्वसंस्कृती एवम् पर्यावरण संरक्षण आयोग यांच्यातर्फे पीएच. डी. प्रदान करण्यात आली. दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात डॉ. ईशा अग्रवाल त्यांच्या हस्ते कुलकर्णी यांना पदवी प्रदान करण्यात आली. कुलकर्णी हे ३६ वर्षांपासून शिवरत्न शिक्षण संस्थेच्या शंकरराव मोहिते-पाटील इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज धवलनगर यशवंतनगर येथे हिंदी विषयाचे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. अतुल्य भारत पुरस्कार, समाजरत्न पुरस्कार, आदर्शरत्न सन्मान पुरस्कार, भारतरत्न सन्मान पुरस्कार, मुन्शी प्रेमचंद विद्या वाचस्पती उपाधी, शिक्षक नायक सन्मान, युनिव्हर्सल ह्युमन डिग्ग्निटी अवॉर्ड, डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रीय अवार्ड, रवींद्रनाथ टागोर राष्ट्रीय अवार्ड, मदर टेरेसा बुक ऑफ इंडिया प्राइड इंटरनॅशनल अवॉर्ड, स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल प्राईड याची वर्स अवॉर्ड, महात्मा गांधी इंटरनॅशनल आयकॉन अवॉर्ड, गौतम बुद्ध इंटरनॅशनल रिलीजन्स अवॉर्ड पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. यापूर्वी त्यांना आदर्श हिंदी शिक्षक तसेच रोटरी क्लब चा राष्ट्र निर्माण पुरस्कार मिळाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

