Maharashtra PoliticsSakal
पुणे
Maharashtra Politics : सरकार टिकविण्यासाठीच कोकाटेंवर कारवाई नाही, शशिकांत शिंदे यांचा आरोप;मंत्रिमंडळातील बेताल वर्तनाकडे डोळेझाक
Shashikant Shinde : शशिकांत शिंदे यांनी मंत्र्यांच्या बेताल वर्तनाकडे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडून डोळेझाक होत असून, सरकार कर्जबाजारी अवस्थेत असूनही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीऐवजी चुकीच्या योजना राबवत आरोप केला.
पुणे : ‘‘कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी शेतकरी संघटना व राजकीय पक्षांकडून होत आहे. तरीही ते पत्रकार परिषद घेऊन राजीनामा देणार नसल्याचे सांगतात. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचा त्यांच्याच मंत्र्यांवर वचक राहिला नाही. ते सरकार टिकवण्यासाठी हतबल असून, मंत्रिमंडळातील बेताल वर्तनाकडे डोळेझाक करीत आहेत,’’ अशा शब्दांत शशिकांत शिंदे यांनी सरकारवर घणाघात केला.