पुणे जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धा

पुणे जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धा
Published on

शिवाजीनगर ः मॉडर्न बॅडमिंटन संकुलात सुरू असलेल्या सुशांत चिपलकट्टी स्मृती कुमार आंतरराष्ट्रीय ग्रँड प्रिक्स बॅडमिंटन स्पर्धेत (डावीकडील) पहिल्या छायचित्रात मुलांच्या गटात विजेता ठरलेला देव रुपारेलिया तर मुलींच्या गटातील विजेती ईशिता नेगी शटल परतविताना.
--------------
बॅडमिंटनच्या ओळी
-----------


प्रभात रोड ः सिंबायोसिस स्पोर्ट्स सेंटरच्या टेबल टेनिस हॉलमध्ये झालेल्या पुणे जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत पुरुष गटात विजेता ठरलेला शौनक शिंदे जोरदार फटका मारताना.

शौनक शिंदेला जेतेपदाचा मान
पुणे जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धा

पुणे, ता. ३१ ः सिंबायोसिस स्पोर्ट्स सेंटर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या चौथ्या पुणे जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत पुरुष गटात शौनक शिंदेने विजेतेपदाचा मान मिळविला.
पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने प्रभात रोड येथील सिंबायोसिस स्पोर्ट्स सेंटरच्या टेबल टेनिस हॉलमध्ये झालेल्या या स्पर्धेत पुरुष गटात अंतिम फेरीत आठव्या मानांकित शौनक शिंदेने जोरदार खेळ करताना तिसऱ्या मानांकित शौनक सानपूरकरचा ४-११, ९-११, ९-११, ११-३, १५-१३, ११-९, ११-६ असा पराभव करून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. या सामन्यात शौनक सानपूरकरने शौनक शिंदे विरुद्ध पहिल्या तीन गेम ११-४, ११-९, ११-९ अशा जिंकून ३-० आघाडी घेतली. यावेळी सामना एकतर्फी होईल असे वाटत असताना पिछाडीवर असलेल्या शौनक शिंदेने जोरदार कमबॅक करताना पुढील चारही सेट ११-३, १५-१३, ११-९, ११-६ अशा फरकाने जिंकून विजय मिळवला.
त्याआधी उपांत्य फेरीत आठवे मानांकन असलेल्या शौनक शिंदेने बिगर मानांकित नील नवरेवर ११-७, ११-७, ११-७, ११-९ असा तर तिसऱ्या मानांकित शौनक सानपूरकरने दुसऱ्या मानांकित जय पेंडसेवर ११-३, ९-११, १५-१३, ११-५, ११-७ असा विजय मिळविला होता.
उपांत्यपूर्व फेरीत आठव्या मानांकित शौनक शिंदेने अव्वल मानांकित शुभंकर रानडेचा ५-११, ११-१३, ११-८, ११-४, ११-८ असा, बिगर मानांकित नील नवरेने पाचव्या मानांकित निशाद लेलेचा १२-१०, ११-१३, ११-९, ११-८ असा तिसऱ्या मानांकित शौनक सानपूरकरने बिगर मानांकित दानिश आगाचा १२-१०, ११-६, ११-९ असा तर दुसऱ्या मानांकित जय पेंडसेने सातव्या मानांकित नरेन इंदानीला १२-१०, ८-११, ८-११, ११-७, ११-९ असे हरविले होते.
विजेता शौनक शिंदे हा सी. पी. बेरार महाविद्यालयात एम ए इकॉनॉमिक्सचे शिक्षण घेत असून तो इंडिया खेलेगा टेबल टेनिस अकादमीत सन्मय परांजपेच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.
-------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com