पुणे - ‘तमाम उम्र गालिब ये भूल करता रहा, धूल चेहरे पे थी और आईना पोछता रहा,’ अशा शेरो-शायरींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये विरोधकांना अप्रत्यक्ष लक्ष्य केले..महापालिका निवडणूक प्रचारात मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाषणांसह मुलाखतींमध्येही शेरो-शायरीचा प्रभावी वापर केला. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना उमेदवारी देण्याच्या मुद्द्यावरून त्यांनी नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला..मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रचाराच्या शेवटच्या रविवारी पिंपरी-चिंचवड रोड शो आणि त्यानंतर पुण्यात मुलाखतीच्या माध्यमातून पुणेकरांशी संवाद साधला. गुन्हेगारांना उमेदवारी दिल्याच्या प्रश्नावर उत्तर देताना फडणवीस यांनी शायरीने सुरुवात केली. ‘तमाम उम्र गालिब ये भूल करता रहा, धूल चेहरे पे थी और आईना पोछता रहा,’ अशा शब्दांत त्यांनी थेट नाव न घेता उपमुख्यमंत्री पवार यांना टोला लगावला. त्यावर उपस्थितांनीही जोरदार टाळ्या वाजवून दाद दिली.‘एकीकडे कोयता गॅंगमुक्त शहर करा, गुन्हेगारीमुक्त शहर करण्याच्या सूचना केल्या जातात आणि दुसरीकडे हेच गुन्हेगारांना उमेदवारी देतात, असा टोला अजित पवार यांचे नाव न घेता लगावत फडवणीस म्हणाले, ‘गृहमंत्री म्हणून पुण्यातील गुन्हेगारी मोडून काढल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. असे गुन्हेगार निवडून आले तरी त्यांची जागा महापालिकेत नव्हे, तर तुरुंगातच असेल.’.भोसरीतही समाचारभोसरी येथे झालेल्या कोपरा सभेतही त्यांनी ‘क्यूँ पड़े हो चक्कर में, कोई नहीं टक्कर में,’ असे म्हणत नाव न घेता अजित पवार यांच्यावर टोला लगावला. यापूर्वी शनिवारी आकुर्डीतील सभेतही फडणवीस यांनी शेरो-शायरीतून विरोधकांवर निशाणा साधला होता.‘परिंदे को मिलेगी मंजिल यकीनन, ये उनके फैले हुए पंख बोलते हैं; और वही लोग रहते हैं खामोश अक्सर, जमाने में जिनके हुनर बोलते हैं,’ म्हणत थेट पवार यांच्यावर निशाणा साधला होता. महापालिका निवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्र्यांच्या शेरो-शायरीचा विषय चर्चेचा ठरत असून, त्यातून राजकीय टीका अधिक धारदार होत असल्याचे चित्र आहे.....परिंदा उड नहीं पाता - अजित पवारमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केलेल्या शायरीला उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार मोशीत म्हणाले, ‘हर पंख फैलाने वाला परिंदा उड नहीं पाता, कहीं सपने घमंड और गलत दिशा में ही टूटते जाते हैं ! हुनर की बातें करने से कुछ नहीं होता. जमाना उसी को पहचानता है, जो मैदान में उतरकर साबित करे.’.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.