

भरदिवसा १५ शेळ्यांची चोरी; गावात भीतीचे वातावरण
पांडे, ता. १० : पांडे परिसरात भरदिवसा १५ शेळ्यांची चोरी झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने गावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर करमाळा-पांडे रस्त्यालगत असलेल्या मोहोळकर मळा येथे दुपारी सुमारे दोनच्या सुमारास मुनिलाल मुजावर यांच्या शेळ्या पिंपळाच्या झाडाखाली सावलीत बसल्या होत्या. त्यावेळी एक चारचाकी गाडी तेथे येऊन थांबली. गाडीतून उतरलेल्या व्यक्तीने तहान लागल्याचे सांगून पाण्याची बिसलरी आणून देण्याची विनंती केली. त्यावरून मुनिलाल मुजावर मोटारसायकलवरून गावातील दुकानात पाणी आणण्यासाठी गेले.
याच संधीचा फायदा घेत अज्ञातांनी कोणी नसल्याचे पाहून झाडाखाली बसलेल्या १५ शेळ्या गाडीत भरून चोरी करून नेल्या. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.