जीवनाच्या वाटा बंद झाल्यावर वृद्धाश्रमाचा आश्रय; महंत शिवलक्ष्मी यांची खंत | Old Age Home | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जीवनाच्या वाटा बंद झाल्यावर वृद्धाश्रमाचा आश्रय; महंत शिवलक्ष्मी यांची खंत
जीवनाच्या वाटा बंद झाल्यावर वृद्धाश्रमाचा आश्रय; महंत शिवलक्ष्मी यांची खंत

जीवनाच्या वाटा बंद झाल्यावर वृद्धाश्रमाचा आश्रय; महंत शिवलक्ष्मी यांची खंत

- अशोक बालगुडे

उंड्री - मुलं मोठी झाली की, आई-वडिलांना विसरतात. त्यांच्यासाठी त्या अडगळीच्या वस्तू होतात. कृतघ्न होऊन आई-वडिलांना वाऱ्यावर सोडून देतात. वय झाल्याने आर्थिक व शारीरिक कुवत संपलेली असते, त्यामुळे त्यांना वृद्धाश्रमाचा सहारा घ्यावा लागतो, अशी खंत महंत शिवलक्ष्मी यांनी व्यक्त केली.

वडकी (ता. हवेली) येथील गंगातारा वृद्धाश्रमामध्ये दिवाळी फराळाचे औचित्य साधून त्यांनी वृद्धांशी संवाद साधत त्यांना बोलते केले. याप्रसंगी वृद्धाश्रमच्या अध्यक्षा नीता भोसले आणि सचिव अॅड. लक्ष्मी माने यांच्यासह वृद्ध उपस्थित होते.

महाराष्ट्र किन्नर आखाडाचे संस्थापक अध्यक्ष महंत शिवलक्ष्मी आईसाहेब यांनी भेट दिली. त्यांनी वृद्धांना फराळ देत गप्पांची मैफल रंगविली.

गंगातारा वृद्धाश्रमातील यशवंत गोळे म्हणाले की, १५ वर्षे मुंबई तर पुण्यात २० वर्षे चालक म्हणून नोकरी करत उदरनिर्वाह केला. मागिल सहा महिन्यापासून या आश्रमात राहत असल्याचे सांगितले. मला आत्महत्या करून जीवनयात्राच संपवायची होती. मात्र, मित्राने धीर दिला आणि आत्महत्येपासून दूर झालो आणि या वृद्धाश्रमात आलो, असा जीवनपट उलगडून दाखविला.

हेही वाचा: Pune Crime : विषारी औषध पाजून मुलाचा खून करणाऱ्या आईस जन्मठेप

हडपसर- ससाणेनगरमध्ये वासंती रमेश चांडक राहत होत्या. पती दिवाणजी होते, तर स्वतःही उदरनिर्वाहासाठी काम करत होते. त्यांना 2 मुले व 2 मुली असूनही त्यांना वेगळे राहावे लागले. कोरोनाकाळात मोलमजूरी करून साठलेला पैसा संपल्याने उपासमारी व भीक मागण्याची वेळ आली. तरीही त्यांच्या मुलांना आईवडिलांविषयी कळवळा आला नाही. वासंती चांडक यांच्या बहिणीच्या मुलाने त्यांना या आश्रमात सोडले. त्यांचे पती बेपत्ता आहेत, मुलं पैसे देत नाहीत, उलट आश्रमात येऊन मारहाण करीत असल्याची व्यथा त्यांनी मांडली.

महंत शिवलक्ष्मी म्हणाल्या की, आजींची मुलं पुणे आणि हडपसरमध्ये कधी दृष्टीस पडली, तर चाबकाचे फटके द्या. अशा कृतघ्न मुलांकडून आईवडिलांना पोटगी मिळवून देण्याची जबाबदारी माझी राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

अॅड. लक्ष्मी माने व संस्थापक अध्यक्ष नीता भोसले यांनी गंगातारा वृद्धाश्रमाविषयी माहिती दिली. कोणत्याही आर्थिक लाभाच्या हेतूने आश्रम चालवत नाही. फक्त वृद्धांना हक्काचं घर मिळावं आणि आम्हाला त्यांचे आशीर्वाद हाच आमचा स्वार्थ आहे. समाजातील सर्व मुलांनी आपल्या आईवडिलांना सांभाळावं म्हणजे असे आश्रम उघडण्याची वेळंच येणार नाही, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

loading image
go to top