शेळवेत  33 व्या वर्षी साजरी झाली केरकचऱ्याची होळी; प्रशांत वाघमारे या प्राथमिक शिक्षकाचा अनोखा उपक्रम

शेळवेत 33 व्या वर्षी साजरी झाली केरकचऱ्याची होळी; प्रशांत वाघमारे या प्राथमिक शिक्षकाचा अनोखा उपक्रम

Published on

UPR26B07573
पंढरपूर : शेळवे येथे केरकचऱ्याची होळी रचून पर्यावरण संरक्षणाची शपथ घेताना विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थ.
---
शेळवेत सलग ३३ वर्षे
झाली केरकचऱ्याची होळी
शिक्षक प्रशांत वाघमारेंचा अनोखा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
पंढरपूर, ता. ३ : प्राथमिक शिक्षक प्रशांत वाघमारे यांनी शेळवे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत केरकचऱ्याची होळी साजरी केली. गेल्या ३३ वर्षांपासून त्यांचा हा उपक्रम सुरू आहे. कोणताही लाकूडफाटा व गोवऱ्या न जाळता कचरा गोळा करून होळी साजरी करण्यात आली.
ग्रामस्वच्छते द्वारा विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी केरकचरा एकत्रित गोळा केला. त्यातील प्लास्टिकचे कागद वेगळे काढण्यात आले. होळीचे विधिवत पूजन‌ संतोष बागल व सरपंच अनिल गाजरे यांनी केले. यावेळी मुख्याध्यापक प्रशांत वाघमारे यांनी ग्रामस्वच्छतेद्वारा गोळा होणाऱ्या केरकचऱ्याच्या आधुनिक होळीची माहिती दिली. सानिका गाजरे हिने होळीमध्ये कोणताही लाकूड फाटा व गोवऱ्या न जाळण्याची प्रतिज्ञा दिली. आरोही सुर्वे हिने पर्यावरण रक्षण व संवर्धनाची सर्वांना शपथ देऊन, नवीन वृक्ष लागवडीची प्रतिज्ञा घेतली. आलिशा शेख हिने अंधश्रद्धा न पाळता अनिष्ट रूढी, परंपरा, व्यसने, वाईट विचार होळीमध्ये जाळून टाकण्याची प्रतिज्ञा दिली. तर आरोही गाजरे हिने होळीमध्ये पोळी व पैसे न टाकता ते गरजूंना दान देण्याचे आवाहन केले.
यावेळी संभाजी गाजरे, अरुण गाजरे, नारायण गाजरे, हरिदास गाजरे, सद्दाम शेख, विजया गाजरे, सोमा सुर्वे, सदाशिव गाजरे, बाळासाहेब गाजरे, विद्यार्थी, शिक्षक व पालक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com