कोजागिरी पौर्णिमेनिमित्त शेटफळच्या जिव्हाळा ग्रुपच्या वतीने संगीत मैफिल संपन्न आयोजन

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त शेटफळच्या जिव्हाळा ग्रुपच्या वतीने संगीत मैफिल संपन्न आयोजन
Published on: 

CKL26B03267
शेटफळ (ता. करमाळा) ः कोजागरीनिमित्त आयोजित संगीत मैफलीत सादरीकरण करताना कलाकार.

कोजागरीच्या चांदण्यात रंगली सुरांची मैफल

चिखलठाण, ता. २८ : कोजागरी पौर्णिमेनिमित्त शेटफळ येथे जिव्हाळा ग्रुप व सर्व संगीतप्रेमी मंडळींच्या वतीने आयोजित संगीत मैफिलीला श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागराज शेती मॉलसमोरील प्रांगणात रंगलेली ही मैफल मध्यरात्रीपर्यंत सुरू होती. मसाला दुधाचा आस्वाद घेत श्रोत्यांनी सुरेल गीतांचा आनंद लुटला.
‘पंढरीच्या पांडुरंगाच्या रूप पाहता लोचनी’ या अभंगाने मैफिलीची सुरुवात झाली. त्यानंतर ‘इंद्रायणी काठी देवाची आळंदी’, ‘हे सुरांनो चंद्र व्हा’, ‘चमके शिवबाची तलवार’ अशा गीतांनी मैफिलीला रंगत आणली. ‘दिल दिया है, जान भी देंगे, ए वतन तेरे लिए’ या देशभक्तिपर गीताने वातावरण भारावून गेले. उत्तरार्धात ‘बळीराजाच्या जीवा शिवाची बैलजोडी’, ‘विसरू नको तू आई-बापाला’, ‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ अशा गीतांनी श्रोत्यांची मने जिंकली. ‘हेची दान देगा देवा’ या भैरवीने मैफिलीची सांगता झाली. चार-पाच तास रंगलेली मैफल कधी संपली, हे श्रोत्यांना समजलेच नाही.
संगीत विशारद सोमनाथ ढोले यांच्या सुरेल गायनाला तबला विशारद पवन पाटील, पखवाजवादक माऊली ढवळे, आण्णासाहेब भानवसे आणि आप्पा जाधव यांनी साथसंगत केली.
यावेळी लोकविकास फार्मर प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष वैभव पोळ, माजी सरपंच मुरलीधर पोळ, विलास आप्पा लबडे, साहेबराव पोळ, महावीर निंबाळकर, विजय लबडे, दयानंद पोळ, नानासाहेब पोळ, भरत पोळ, आनंद गोरे, सुनील वळेकर, विनोद गोरे, गणेश मोरे, नानासाहेब साळुंके आणि धनाजी नाईकनवरे उपस्थित होते. गणेश मोरे यांनी सूत्रसंचालन केले, तर महादेव पोळ व सनी पोळ यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com