तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत शेटफळ हवेलीच्या मुलींच्या संघाने पटकावला प्रथम क्रमांक

vadapuri
vadapuri

वडापुरी - इंदापूर येथील क्रिडा संकूल मध्ये ता. ८ सप्टेंबर रोजी झालेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत भैरवनाथ ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित माध्यमिक विद्यालय शेटफळ हवेली येथील १९ वर्षे वयोगटातील मुलींनी प्रथम क्रमांक पटकावला असून सलग दहा वेळा तालुकापातळीवर प्रथम क्रमांक मिळविण्याचा मान मिळविला आहे. 

इंदापूर येथे तालुका स्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी झालेल्या स्पर्धेत शेटफळ हवेलीच्या मुलींनी खो- खो स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला व गेल्या दहा वर्षाची असलेल्या यशाची परंपरा कायम राखली आहे. 

यावेळी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब करगळ, सचिव दिलीप खडसे, उपसरपंच नामदेव करगळ, शाळा व्यवस्थापन समीतीचे अध्यक्ष स्वप्नील करगळ,  विजयसिंह कानगुडे, मुख्याध्यापक आर आर पांढरे, क्रीडा शिक्षक हनुमंत ननवरे, शहाजी वाघमारे यांनी खेळाडूंचे चांगली कामगीरी केल्याबद्दल अभिनंदन केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com