पारनेर -शिव पानंद रस्ते

पारनेर -शिव पानंद रस्ते
Published on

‘शेत सेतू-महापाणंद गतिशक्ती’
वाडी-वस्तीवर पोहोचवा ः पवळे

पारनेर, ता. २१ : राज्यातील शेतकऱ्यांना बारमाही, सुरक्षित आणि सुलभ शेत रस्ते मिळावेत यासाठी सुरू असलेले ‘शेत सेतू-महापाणंद गतिशक्ती’ अभियान कालमर्यादेत वाडी-वस्तीपर्यंत पोहोचवावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे यांनी केली.
शेत व पाणंद रस्त्यांचे डिजिटल मॅपिंग, सीमांकन आणि नियोजन करून ‘महापाणंद ग्रीड’ उभारण्याचे उद्दिष्ट अभियानाचे आहे. राज्यातील २८ हजार ग्रामपंचायतींमधील ५० हजार रस्त्यांवर प्राधान्याने कार्यवाही केली जाणार आहे. चार लाख रस्त्यांचे डिजिटल मॅपिंग करण्याचे शासनाचे नियोजन आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीतून किमान दोन रस्त्यांची निवड करून भू-संदर्भित नकाशांच्या आधारे त्यांची लांबी, रुंदी व अक्षांश-रेखांश निश्‍चित केले जाईल.
१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर दरम्यान विशेष मोहीम राबवली जात आहे. ग्रामसभा, जनजागृती, रस्ते निवड, सीमांकन व अतिक्रमणमुक्तीची कार्यवाही केली जाईल. रस्त्यांच्या सीमांकनासाठी कोणतेही मोजणी शुल्क आकारले जाणार नाही. सर्व रस्ते डिजिटल नेटवर्कमध्ये समाविष्ट होणार असल्याने नियोजन पारदर्शक होईल.
-------------
‘गरजवंतांना प्राधान्य द्या’
शेत रस्त्यांसाठी वर्षानुवर्षे संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यांना डावलून कागदोपत्री रस्ते निवडू नयेत. ज्यांचे रस्ते बंद आहेत, अशा गरजवंतांना प्राधान्य देऊन पारदर्शक निवड करावी, अशी मागणीही पवळे यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com