शेवगाव : जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी शेवगावात ९८.२९ टक्के मतदान

शेवगाव : जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी शेवगावात ९८.२९ टक्के मतदान
Published on: 

तालुका ः शेवगाव
..................
ARM26B03721, ARM26B03722
शेवगाव : जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी मतदान केंद्रावर लागलेली मतदारांची रांग.

शेवगाव : मतदारांना मतदानासाठी एकत्रितपणे घेऊन येताना माजी आमदार चंद्रशेखर घुले, वसंत कापरे व इतर पदाधिकारी.
.....................
९८ टक्के मतदान; प्रक्रिया शांततेत

शेवगाव, ता. २ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शेवगाव येथील मतदान केंद्रावर ११७ पैकी ११५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे ९८.२९ टक्के मतदान झाले. बसस्थानकासमोरील कन्या विद्यालयात सोमवारी (ता. २) शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली.

मतदान केंद्रावर सहकार विकास पॅनेलचे प्रमुख माजी आमदार चंद्रशेखर घुले, बिनविरोध संचालक राजश्री घुले आणि डॉ. क्षितिज घुले यांनी दिवसभर तळ ठोकला होता. तर सहकार परिवर्तन पॅनेलच्या उमेदवार हर्षदा काकडे यांनी मतदान केंद्राला भेट देऊन प्रक्रियेचा आढावा घेतला.

माजी आमदार चंद्रशेखर घुले, ॲड. वसंत कापरे, काकासाहेब नरवडे, संजय कोळगे, अमोल सागडे, बाजार समितीचे सभापती हनुमान पातकळ, बबन भुसारी यांच्यासह तिन्ही मतदारसंघांतील मतदार एकत्रितपणे मतदान केंद्रावर दाखल झाले.

बिगरशेती मतदारसंघातील २१ पैकी सर्व २१, शेतीपूरक मतदारसंघातील २७ पैकी २६, तर सेवा सोसायटी मतदारसंघातील ६९ पैकी ६८ मतदारांनी मतदान केले. शेतीपूरक मतदारसंघातील अरुण मुंढे, तर सेवा सोसायटी मतदारसंघातील नितीन काकडे यांनी मतदानाचा हक्क बजावला नाही.

पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.