सावज होण्यापेक्षा सावध व्हा!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 एप्रिल 2018

पुणे - प्रत्येक क्षेत्रात महिलांना अनेक अनुभव येतात. समाजात चांगल्या- वाईट अशा दोन्ही प्रकारच्या प्रवृत्ती आहेत. मात्र, महिलेने आपण कोणाचेही ‘भक्ष्य’ होता कामा नये. सावज होण्यापेक्षा सावध राहावे, हा संदेश देणारा ‘शिकारी’ हा चित्रपट असून, मनोरंजनातून चित्रपटांचे सादरीकरण केले आहे. 

महेश मांजरेकर मूव्ही प्रस्तुत ‘शिकारी’ या चित्रपटाची निर्मिती आहे. शुक्रवारी (ता. २०) हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. यात बोल्ड भूमिका साकारणारी नेहा खान, अभिनेता सुव्रत जोशी आणि दिग्दर्शक विजय माने यांनी ‘सकाळ’ कार्यालयाला भेट दिली, त्या वेळी त्यांनी चित्रपट करण्याविषयीची भूमिका स्पष्ट केली.    

कोल्हापूर जवळच्या एका गावात घडणारी ही कथा. गावात सविता नावाची कमनीय बांधा असलेली तरुणी राहते. बॉलिवूडमध्ये आघाडीची नायिका बनण्याचे तिचे स्वप्न असते. आपण हिंदी चित्रपटसृष्टीतील नामवंत व्यक्ती असल्याची बतावणी रघू आणि त्याचा मामा यांनी केलेली आहे. नेमकी त्याच क्षणी रघूची नजर सवितावर पडते आणि मायावीनगरीची सविता शिकार होते. अशी ‘शिकारी’ चित्रपटाची कथा आहे. 

याबाबत माने म्हणाले, ‘‘फिल्म इंडस्ट्री हे ग्लॅमरचे क्षेत्र आहे. पण येथेही, तसेच अन्य कोणत्याही क्षेत्रात कोणतीही स्त्री शिकार होऊ नये, हेच मनोरंजनातून सांगण्याचा प्रयत्न चित्रपटातून केला आहे.’’

अभिनेत्री नेहा म्हणाली, ‘‘रेल्वेमध्ये, रस्त्यावर अनेक ठिकाणी चांगली- वाईट माणसे असतात. महिलेकडे बघण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा निराळा असतो. पुरुष शरीर सौष्ठव स्पर्धांत सहभागी होतात; पण बिकिनीतल्या स्त्रीला नावे ठेवली जातात. स्त्रियादेखील मेहनतीने एखादी गोष्ट साध्य करतात. अर्थात, त्या पाठीमागे त्यांची जिद्द, कष्ट करण्याची तयारी असते. म्हणून त्या त्यांच्या क्षेत्रात यशस्वी होतात; पण तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला असायला हवा.’’ 

अभिनेता सुव्रत म्हणाला, ‘‘फिल्म इंडस्ट्रीबद्दल लोकांच्या मनात निरनिराळ्या कल्पना आहेत. मात्र, वस्तुस्थिती निराळी आहे. ‘दिल दोस्ती’नंतर ‘शिकारी’ चित्रपटातील भूमिका माझ्यासाठी अफलातून आहे. चित्रपटाची पटकथा वाचल्यावर मी लगेचच भूमिकेसाठी होकार दिला.’’

Web Title: shikari movie entertainment