शिंगणापूर यात्रेसाठी पाणी पुरवठा विभाग सज्ज

शिंगणापूर यात्रेसाठी पाणी पुरवठा विभाग सज्ज

Published on

शिखर शिंगणापूर यात्रेसाठी प्रशासन सज्ज
पिण्याच्या पाण्यासाठी पाच टँकर; पाणी तपासणीची तयारी
सकाळ वृत्तसेवा
माळशिरस, ता. १६ : अखिल महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या शिखर शिंगणापूरच्या मोठ्या महादेवाची यात्रा २३ मार्चपासून सुरू होत असून, यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी माळशिरस तालुक्याची प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. यात्रेदरम्यान भाविकांना पिण्याच्या पाण्याची अडचण भासू नये यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या असल्याची माहिती पंचायत समितीचे पाणीपुरवठा उपअभियंता जयेश सदावरे यांनी दिली.
यात्रेदरम्यान पिण्याच्या पाण्यासाठी पाच टँकरची मागणी करण्यात आली असून, या टँकरमध्ये कारुंडे येथील पाणीपुरवठा विहिरीतून पाणी भरले जाणार आहे. शिंगणापूर घाट, पिंपरी परिसर, कोथळे परिसर तसेच मुंगी घाट परिसरातील भाविकांना या टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार असून, दररोज चार ते पाच खेपा करण्यात येणार आहेत.
दरवर्षीप्रमाणे पाणी शुद्धीकरण व तपासणीसाठी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिंगणापूर भवानी घाट परिसरातील दोन शासकीय व दोन खासगी टाक्यांमध्येही पाणीपुरवठा केला जाणार असून, घाट परिसरात टँकर उभे करण्यात येणार आहेत. यात्रेदरम्यान पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी पाणीपुरवठा विभागातील शाखा अभियंते, ग्रामसेवक व आरोग्य कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे.
कारुंडे ग्रामपंचायतीकडून टँकर भरण्याच्या ठिकाणी कर्मचारी नियुक्त करून वीजपुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वीजपुरवठा खंडित झाल्यास इंजिनच्या साहाय्याने टँकर भरण्याची व्यवस्था ठेवण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
पिंपरी ग्रामपंचायतीने शिंगणापूर, उंबरदेव व नांद्रुक परिसरातील पिण्याच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करून टँकरद्वारे पाणी भरण्याची तयारी केली आहे. यात्रेकरूंना शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी सर्व संबंधित विभाग सज्ज असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
---
चाैकट
पाणीपुरवठ्याची अशी तयारी...
कोथळे ग्रामपंचायतीच्या नळ पाणीपुरवठा विहिरीवर पंपाची व्यवस्था करून टँकरमध्ये पाणी भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच कोथळे येथील ओढ्यातील कावड भेटीच्या ठिकाणी नळ कोंडाळे सुरू ठेवणे, पाण्याच्या टाक्या स्वच्छ ठेवणे आणि हातपंप दुरुस्त करून सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com