Shikrapur Citizens Alert: सात अट्टल चोरटे ‘पब्लिक पोलिसींगअलर्ट’मुळे गजाआड; सजग नागरिकांचा शिक्रापूर-कोरेगाव बाजारात सन्मान

सजग नागरिकांच्या मदतीने शिक्रापूर-कोरेगाव आठवडे बाजारातील सात अट्टल चोरटे पोलिसांच्या ताब्यात; ‘पब्लिक पोलिसींग’मुळे चोरीच्या साखळीला ब्रेक
Seven thieves caught in Shikrapur and Koregaon Bhima weekly markets with help of alert citizens under public policing initiative

Seven thieves caught in Shikrapur and Koregaon Bhima weekly markets with help of alert citizens under public policing initiative

Sakal

Updated on

शिक्रापूर : गुन्हा घडण्याआधी नागरीक सजग असल्यावर काहे होते याचा प्रत्यय शिक्रापूर पोलिसांना आला तो असा की, शिक्रापूर आणि कोरेगाव भिमा येथील आठवडे बाजारात तब्बल ७ अट्टल चोरटे पकडले गेले व तीन गुन्हे दाखल झाल्याने दोन्ही बाजारातील चोरीचे गुन्हेच थांबण्याची शक्यता निर्माण झाली. दरम्यान वरील तिनही गुन्ह्यात सजग राहिलेल्या सुरेश भांडवलकर, दिनेश भोरे, साईनाथ शिनगारे, सिकंदर शेख, रियाज शेख यांना शिक्रापूर पोलिसांनी खास पोलिस ठाण्यात बोलावून सन्मानित करुन प्रोत्साहित केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com