Land Deal Fraud: शेतजमिनीच्या व्यवहारात १.९० कोटींची फसवणूक; गुजरात-पुण्यातील दोघांविरुद्ध गुन्हा

Land Deal Fraud: आठ एकर जमिनीच्या खरेदीत दुसऱ्याच कंपनीचे धनादेश देऊन आणि पैसे न देता व्यवहार केल्याचा आरोप; शिक्रापूर पोलिसांकडून गुजरात व पुण्यातील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल.
A case has been registered against two men for allegedly cheating a landowner in an eight-acre land deal in Nimgaon Mhalungi.

A case has been registered against two men for allegedly cheating a landowner in an eight-acre land deal in Nimgaon Mhalungi.

esakal

Updated on: 

शिक्रापूर : निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील ८ एकर शेतजमिनीच्या खरेदीत दुसऱ्याच कंपनीचे धनादेश देऊन १ कोटी ९० लाख ३० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुजरात व पुण्यातील दोघांविरुद्ध शिक्रापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत शिक्रापूर पोलिसांनी सांगितले की, निमगाव म्हाळुंगी येथील गट क्रमांक १०३७ व १०३८ मधील एकूण ८ एकर जमीन फिर्यादी अ‍ॅड. महेश विठ्ठलराव ढमढेरे (वय ४९) व निमगाव म्हाळुंगी येथील किरण काळे यांनी सन २०२३मध्ये एकत्र खरेदी केली होती.

Loading content, please wait...