esakal | शिक्रापूर-न्हावरे राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला होणार लवकरच सुरुवात, वाचा ही बातमी
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्रापूर-न्हावरे राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला होणार लवकरच सुरुवात, वाचा ही बातमी

मुंबई-चाकण-शिक्रापूर-जामखेड ५४८-डी या नावाने घोषित झाला आहे.

शिक्रापूर-न्हावरे राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला होणार लवकरच सुरुवात, वाचा ही बातमी

sakal_logo
By
नागनाथ शिंगाडे

तळेगाव ढमढेरे (पुणे) : शिरूर तालुक्यातील शिक्रापूर-तळेगाव ढमढेरे-न्हावरे या '५४८-डी' राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याच्या कामाची वर्कऑर्डर ठेकेदाराला दिली असून, त्वरित कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती भाजपचे पदाधिकारी व बाजार समितीचे संचालक राहुल गवारे यांनी 'सकाळ'ला आज दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

मुंबई-चाकण-शिक्रापूर-जामखेड ५४८-डी या नावाने घोषित झाला आहे. हा राष्ट्रीय महामार्ग तळेगाव दाभाडे ते शिक्रापूर रस्ता सहापदरी करण्यासाठी आणि शिक्रापूर ते केडगाव चौफुला हा रस्ता चार पदरी करण्यासाठी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणातर्फे सुमारे १८०० कोटी रुपयांचा सविस्तर प्रकल्प अहवाल बनविण्यात आला होता. याबाबत सु. दे. चिटणीस, राजीव सिंग व डी. ओ. तावडे यांच्याकडे सतत पाठपुरावा करण्यात आला होता. परंतु, भूसंपादन कामास वेळ लागणार असल्याने तसेच, शिक्रापूर-न्हावरे रस्त्याची दुरवस्था लक्षात घेऊन या रस्त्याचे तातडीने सात मीटर रुंदीकरण करावे, अशी आग्रही भूमिका तत्कालीन भाजपचे आमदार बाबुराव पाचर्णे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

त्यानंतर मंत्री गडकरी यांच्या सुचनेनुसार राष्ट्रीय महामार्ग विभागाचे महाराष्ट्र राज्य मुख्य अभियंता विनय देशपांडे यांनी ४६ कोटीचे अंदाजपत्रक रस्ते व वाहतूक मंत्रालयाला सादर करून त्याची निविदा प्रक्रिया १४ सप्टेंबर २०१९ रोजी सुरु केली होती. या निविदा प्रक्रियेत १७ ठेकेदारांनी सहभाग घेतल्यानंतर राजेंद्र सिंह भांबु इन्फ्रा प्रा. लि. जयपूर यांची कमी दराची निविदा मंजूर झाली आहे. पाचर्णे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, शिक्रापूर-न्हावरे या रस्त्याच्या  कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याचे राहुल गवारे यांनी सांगितले. 

दरम्यान, शिक्रापूर-तळेगाव ढमढेरे-न्हावरे हा २८ किलोमीटर लांबीचा व सात मीटर रुंदीचा रस्ता होणार आहे. दोन्ही बाजूंना दीड मीटरची साईडपट्टी राहणार आहे. सदर रस्त्यासाठी ४२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. कामाची मुदत १८ महिने असून, जयपूरच्या राजेंद्रसिंह भांबू इन्फ्रा कंपनीकडे हे काम देण्यात आल्याचे गवारे यांनी सांगितले.

loading image
go to top