esakal | शिक्रापूर अबब..! शिक्रापूरात दोन दिवसात ४३०० जणांचे महालसीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

लसीकरण

शिक्रापूर : अबब..! शिक्रापूरात दोन दिवसात ४३०० जणांचे महालसीकरण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

शिक्रापूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिक्रापूर (ता.शिरूर) येथील एको-ग्राम सोसायटीत आयोजित मोफत कोवीड प्रतिबंधक लसीकरणाच्या शिबीरात दोन दिवसात ४३०० जणांचे लसीकरण करण्यात आले. दोनच दिवसात एवढे लसीकरण करण्याचा जिल्ह्यातील हा पहिलाच उपक्रम असून या उपक्रमाचे आमदार अशोक पवार यांनीही कौतुक केल्याची माहिती श्री थोरात यांनी दिली.

जनसेवा न्यास व कोंढवा मेडिकल असोसिएशनचे डॉ.दादा कोद्रे, जिल्हा परिषद सदस्या वंदना कोद्रे यांच्या सहकार्याने व शिक्रापूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच रमेश थोरात तसेच येथील उद्योजक रवींद्र भुजबळ, ग्रामपंचायत सदस्य मयूर करंजे यांच्या विशेष प्रयत्नाने ता.२ व ३ अश दोन दिवशी महालसीकरण मोहीम पार पडली. को-वॅक्सीनच्या पहिल्या तसेच ज्यांना दूसरा डोस आवश्यक आहे

हेही वाचा: 'शिवसेनेने जागा दिल्या तरच महाविकास आघाडीचा विचार करू'

अशा दूस-या डोसचे लसीकरण यावेळी करण्यात आले. एवढ्या मोठ्या प्रमाणात लसीकरणाचा शिरुरच नव्हे तर जिल्ह्यातील हा पहिलाच उपक्रम असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या उपक्रमाचे कार्यक्रमाचे दरम्यान डॉ.दादा कोद्रे यांनी सर्व शिक्रापूरकरांचे विशेष अभिनंदन केले. कार्यक्रमाला पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे, माजी सभापती जयमाला जकाते, माजी सरपंच बापूसाहेब जकाते, ग्रामपंचायत सदस्या मोहिनी मांढरे, सीमा लांडे, विशाल खरपुडे, समता परिषदेचे सोमनाथ भुजबळ, ग्रामविकास अधिकारी बी.बी. गोरे, अतुल सासवडे, पंढाभाऊ गायकवाड, निलेश थोरात, सुरेश भुजबळ आदी उपस्थित होते. दरम्यान एवढ्या विक्रमी लसीकरण केल्याबद्दल आमदार अशोक पवार यांनी शिक्रापूरकरांचे विशेष अभिनंदन केल्याची माहिती यावेळी थोरात यांनी दिली.

loading image
go to top