निमगाव-म्हाळूंगीच्या १३ युवकांवर शिक्रापूर पोलिसांची कारवाई

भरत पंचांगे
Thursday, 26 November 2020

शिक्रापूर पोलिस स्टेशन हद्दीतील प्रत्येक गावात अशा छुप्या सामुहिक कार्यक्रमांवर लक्ष ठेवले जात असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली.

शिक्रापूर (पुणे) : कोरोनाचा दुसरा टप्पा सुरू होण्याची चिन्हे असतानाही बिनधास्तपणे वाढदिवस साजरा करणा-या शिरूर तालुक्यातील निमगाव-म्हाळूंगी १३ युवकांवर शिक्रापूर पोलिसांनी बेकायदा जमावबंदीच्या कायद्याचे उल्लंघनाचे गुन्हे दाखल केले. यापुढे शिक्रापूर पोलिस स्टेशन हद्दीतील प्रत्येक गावात अशा छुप्या सामुहिक कार्यक्रमांवर लक्ष ठेवले जात असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली.

गेल्या आठ महिन्यांपासून कोरोनाचा कहर असताना आणि कोरोना पुन्हा डोके वर काढत असताना अनेकांनी सार्वजनिकरित्या एकत्र येवून छोटेमोठे कार्यक्रम सुरू केल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांना होती. याच अनुषंगाने दोन दिवसांपूर्वी (ता.२४) निमगाव-म्हाळूंगी येथील म्हसोबा मंदिरासमोर वाढदिवस जाहिरपणे साजरा करीत असताना आकाश चंद्रकांत भागवत, सचिन सखाराम चव्हाण, विशाल रामभाऊ कुटे, कुणाल अनिल गुंजाळ, सुरेश नारायण भागवत, ओकार वसंत भागवत, रोहित रमेश कुसाळे, विशाल चंद्रकांत वाघचौरे, अक्षय शिवाजी गव्हाणे, भानुदास बोडरे, मयुर बोजने, संकेत शिंदें, शिवाजी शिदें (सर्व रा.निमगाव-म्हांळुगी, ता.शिरूर) या एकूण १३ जणांवर बेकायदा जमावबंदी कायद्याचे उल्लंघनाचे गुन्हे दाखल करण्यात आले. याबाबत पोलिस पाटील किरण अंकुश काळे यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास पोलिस हवालदार राजेंद्र बनकर करीत आहे.

दरम्यान शिक्रापूर हद्दीतील प्रत्येक गावातील सर्व खाजगी आणि तत्सम कार्यक्रमांची माहिती शिक्रापूर पोलिस घेत असून अशा कुठल्याही प्रकारचे कार्यक्रम आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिस निरीक्षक उमेश तावसकर यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shikrapur police has registered a case against 13 youths of Nimgaon Mahalungi in Shirur taluka for violating the law on illegal gathering