शिक्रापूर - उच्च न्यायालयाच्या ध्वनिप्रदुषण नियम कायद्यानुसार बेकायदा ठरलेल्या येथील दोन मंदिरे व एका मस्जिदेवरील अनधिकृत भोंगे काढण्यात आले.
शिक्रापूर पोलिसांनी उच्च न्यायालयाचा कायदा, सरकार स्तरावर राज्यभर याबाबत घेतलेली गंभीर दखल आणि कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने प्रशासनाला सहकार्य करण्याच्या भावनेने घेतलेल्या बैठकीत दोन्ही धार्मिक स्थळांवरील भाविक भक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने शिरुर तालुक्यातील पहिले भोंगेमुक्त गाव शिक्रापूर झाल्याची माहिती उपविभागिय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांनी दिली.