AIच्या युगात तांत्रिक कौशल्याला सर्वाधिक महत्त्व; SDTI सातारा येथे रोजगाराभिमुख कोर्सेससाठी प्रवेश सुरू

AIच्या युगात तांत्रिक कौशल्याला सर्वाधिक महत्त्व; SDTI सातारा येथे रोजगाराभिमुख कोर्सेससाठी प्रवेश सुरू
Published on

शिंदे-देशमुख टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश सुरू

सातारा, ता. १६ : आजच्या स्पर्धात्मक आणि तंत्रज्ञानाधारित युगात केवळ शैक्षणिक पदवीपेक्षा प्रत्यक्ष काम करण्याचे तांत्रिक कौशल्य रोजगार मिळवून देण्यासाठी अधिक महत्त्वाचे ठरत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आणि ऑटोमेशनचा वापर वाढत असताना उद्योगांना आधुनिक तंत्रज्ञानासोबत प्रत्यक्ष मशिन, इलेक्ट्रिकल सिस्टीम, वाहन, बांधकाम व उत्पादन क्षेत्रातील काम हाताळणारे कुशल तंत्रज्ञ मोठ्या प्रमाणावर आवश्यक आहेत. तांत्रिक कौशल्यच रोजगाराच्या संधींचा मजबूत आधार आहे, तसेच योग्य कौशल्य आत्मसात केल्यास नोकरीसोबत स्वयंरोजगाराचीही दारे खुली होऊ शकतात. हीच गरज लक्षात घेऊन येथील शिंदे-देशमुख टेक्निकल इन्स्टिट्यूटद्वारे रोजगार व स्वयंरोजगाराभिमुख शासनमान्य कोर्सेसचे प्रशिक्षण दिले जात आहे.

संस्थेत इलेक्ट्रिशियन, ऑटो इंजिनिअरिंग टेक्निशियन, डिझेल मेकॅनिक, वायरमन, कन्स्ट्रक्शन सुपरवायझर आणि सीएनसी ऑपरेटिंग ॲण्ड प्रोग्रामिंग या अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण सुरू आहे. प्रशिक्षणात विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष प्रॅक्टिकल कौशल्यावर विशेष भर दिला जातो, जेणेकरून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी उद्योगक्षेत्रात आवश्यक काम आत्मविश्वासाने करू शकेल. एआयच्या काळात तंत्रज्ञान बदलत राहणार असले तरी तंत्रज्ञानाचा वापर करणारे आणि प्रत्यक्ष तांत्रिक काम करणारे कुशल मनुष्यबळ कायम आवश्यक राहणार आहे. त्यामुळे युवकांनी भविष्यातील रोजगाराच्या संधी लक्षात घेऊन तांत्रिक कौशल्य प्रशिक्षण घेणे ही काळाची गरज असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू असून, इच्छुक विद्यार्थी व पालकांनी प्रवेशासाठी मोळाचा ओढा (वर्ये रस्ता) येथील शिंदे देशमुख टेक्निकल इन्स्टिट्यूट येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com