विंग: शिंदेवाडी बिबट्याचा वयोवृद्धावर हल्ल्याचा प्रयत्न

विंग: शिंदेवाडी बिबट्याचा वयोवृद्धावर हल्ल्याचा प्रयत्न

Published on

शिंदेवाडी ग्रामस्थांत बिबट्याची दहशत

वृद्धावर हल्ल्याचा प्रयत्न; बंदोबस्त करण्याची मागणी

विंग, ता. २४ ः परिसरात बिबट्याची दहशत कायम असून, शिंदेवाडी (ता. कऱ्हाड) येथे एका वृद्धावर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. काल पहाटे तीनच्या सुमारास भरवस्तीत घडलेल्या घटनेत बबन मारुती मुळगावकर (वय ८०) सुदैवाने बचावले. पहाटे ते लघुशंकेसाठी उठले होते. पत्नी मंगल यांनी आरडाओरडा करून बिबट्याला हुसकावल्याने मोठा अनर्थ टळला.

शिंदेवाडी गाव व परिसरात बिबट्याचे वास्तव कायम आहे. शिवारात ग्रामस्थांना त्याचे वारंवार दर्शन घडत आहे. पाळीव प्राण्यावर हल्ल्याचे सत्र त्याच्याकडून वारंवार सुरूच आहे. दोनच दिवसांपूर्वी एका मोकाट श्वानाचा फडशा त्याने पाडला. दरम्यान, काल पहाटे तो भरवस्तीत घुसला. त्याने एका वृद्धावर हल्ल्याचा प्रयत्न केला. बिबट्याने कुंपणावरून उडी मारली. ती मुळगावकर यांच्या जवळ पडली. आवाजाने जागे झालेल्या पत्नी मंगल यांच्या ही बाब निदर्शनास आली. त्यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने तेथून धूम ठाेकली. या घटनेने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गाव व परिसरात बिबट्याच्या हल्ल्याची चर्चा ग्रामस्थांत रंगली. त्यामुळे दहशत निर्माण झाली आहे.
-----------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com