

SHD26B05254
शिर्डी ः येथील औद्योगिक वसाहती मधिल तोफगोळा निर्मीती प्रकल्पाच्या उदघाटनापूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्याबाबतची माहिती दिली. यावेळी प्रकल्पाचे चेअरमन रविकांत उपस्थित होते.
तोफगोळा निर्मीती प्रकल्पाचे संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते उदघाटन
राधाकृष्ण विखे पाटील ः प्रकल्पाची गुंतवणूक ३ हजार कोटी रुपयांपर्यंत
शिर्डी, ता.१८ ः वर्षाकाठी पाच लाख तोफगोळे निर्माण करणाऱ्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या प्रकल्पाचा प्रारंभ २३ मे रोजी संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल. दोनशे एकरावरील या प्रकल्पासाठी तीन हजार कोटी रूपये गुंतवणूक करण्यात आली. त्यातून पाच हजार तरूणांना रोजगार मिळेल. अहिल्यानगर जिल्हा डिफेन्स हब म्हणून उदयाला येत आहे, ही जिल्हावासियांच्या दृष्टीने अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे, अशी माहिती जिल्ह्याचे पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी तोफगोळे उत्पादित करणाऱ्या ग्लोब फोर्ज लिमिटेडचे चेअरमन रविकांत उपस्थित होते. त्यापूर्वी पत्रकारांची या प्रकल्पाला भेट आयोजित करण्यात आली.
रविकांत म्हणाले की, या प्रकल्पामध्ये १५५ मिलीमीटर क्षमतेच्या तोफगोळ्यांचे उत्पादन होईल. त्यात स्वदेशी तंत्रज्ञान असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया व मेक फॉर द वर्ल्ड''या संकल्पनेतून अवघ्या वर्षभरात हा प्रकल्प उभारला गेला. त्यात सीएनजी प्लाॅन्ट असेल. येथे रॉकेट लॉन्चर, लांब पल्ल्याच्या रॉकेटचे सुटे भाग, स्वयंचलित ड्रोन व विविध इलेक्ट्रॉनिक्स यंत्रणांच्या चाचणी सुविधा विकसित केल्या जातील. या प्रकल्पासाठी १ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित आहे. आतापर्यंत ६०० कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. भविष्यात शिर्डीमध्ये तयार होणाऱ्या आर्टिलरी शेलमध्ये दारूगोळा भरण्याचे उत्पादनही अहिल्यानगरमध्येच सुरू करण्याचा विचार आहे. श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथील उपलब्ध होणाऱ्या जागेवर हा प्रकल्प कार्यान्वित होईल. त्यामुळे संपूर्ण प्रकल्पाची गुंतवणूक ही ३ हजार कोटी रुपयांपर्यंत जाईल आणि रोजगारही पाच हजारांपर्यंत वाढेल.
------------------------
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या प्रकल्पासाठी मोठे सहकार्य लाभले. स्थानिक युवकांना येथे रोजगार मिळविण्यासाठी रतन टाटा ट्रस्टच्या विशेष इनोव्हेशन सेंटर सुरू होईल. त्यासाठी साठी २०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला. उद्योग विभागाकडून ५० कोटी रुपयांचा निधीही मंजुर झाला. तसेच या प्रकल्पाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने २३ व २४ मे रोजी विशेष संरक्षण साहित्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
-राधाकृष्ण विखे पाटील, पालक मंत्री
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.