

सतीश वैजापूरकर
राहाता, ता.५।९।२६
---------------------
महत्वाची बातमी
शिर्डी नाशिक रेल्वेमार्ग
----------------------
SHD26B05929
कोपरगाव ः शिर्डी-नाशिक रेल्वे प्रकल्प बाधित शेतकरी आणि अधिकारी यांच्या संयुक्त बैठकीत आमदार आशुतोष काळे यांनी प्रकल्प बाधितांची बाजू मांडली.
बाधितांना सर्वाधिक मोबदला मिळवून द्या
आमदार काळे यांच्या बैठकीत रेल्वे अधिका-यांना सूचना
कोपरगाव, ता. ५ ः शिर्डी ते नाशिक रेल्वेमार्गासाठी कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे, पोहेगाव, सोनेवाडी, जवळके, शहापूर, बहादराबाद, बहादरपूर व धोंडेवाडी गावांतील शेतक-यांची जमीन अधिग्रहित केला जाणार आहे. या प्रक्रियेत मी शेतक-यांच्या सोबत आहे. प्रकल्प बाधित शेतक-यांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घ्या. त्यांना सर्वाधिक मोबदला मिळेल, असा दृष्टिकोन ठेवा, अशा सूचना आज आमदार आशुतोष काळे यांनी रेल्वेच्या अधिका-यांना दिल्या.
या बैठकीस रेल्वेचे अधिकारी रामनारायण सैनी, भूमी अभिलेखचे शेखर कोकरे यांच्यासह महसूल व अन्य विभागाचे सरकारी अधिकारी आणि प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते. काळे म्हणाले की, या भागातील शेतकऱ्यांनी सिंचनाची व्यवस्था करण्यासाठी मोठा भांडवली खर्च केला. झाडांचे व या भांडवली खर्चाचे मूल्यांकन व्हावे. ऊस आणि फळबागांचे उत्पन्न मिळते. त्यामुळे जमिनीचे मूल्यांकन करताना प्रत्यक्ष शेतीचा वापर, सिंचनाची उपलब्धता, पिकांची उत्पादकता, फळबागा व इतर संबंधित बाबींचा विचार करून बागायती जमिनीप्रमाणे जास्तीत जास्त मोबदला निश्चित करण्यात यावा. शेतीचे दोन भाग होणार असल्याने पाण्याचे प्रवाह अडणार नाहीत. दळणवळणाची गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्यावी. कल्व्हर्ट, क्राॅस ड्रेनेज व जल निःसारण व्यवस्था निर्माण करावी. शेतक-यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यावी.
कोट---------------------------------
रेल्वे विभाग हा शेतकऱ्यांच्या सोबत आहे. शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या जातील. कुणावरही अन्याय होणार नाही. ऐनवेळी उपस्थित होणाऱ्या अडचणी आमदार आशुतोष काळे यांच्या माध्यमातून सोडवल्या जातील. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भूसंपादन प्रक्रिया पार पाडली जाईल.
- रामनारायण सैनी, प्रकल्प अधिकारी, नाशिक-शिर्डी रेल्वेमार्ग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.