शिर्डी ःः महाराजस्व अभियान सांगता बातमी- अभय शेळके

शिर्डी ःः महाराजस्व अभियान सांगता बातमी- अभय शेळके
Published on

ID: SHD26B05258
शिर्डी ः छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाच्या सांगताप्रसंगी नगराध्यक्ष जयश्री थोरात व उपनगराध्यक्ष अभय शेळके यांच्या हस्ते लाभार्थी शेतकऱ्याला ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले. समवेत तहसीलदार अमोल मोरे आदी.

शिर्डीत जनतेच्या प्रलंबित कामे मार्गी
अभय शेळके ः लाभार्थी शेतकऱ्यांना ट्रॅक्टर वितरण
शिर्डी, ता. १८ ः छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाच्या निमित्ताने शिर्डी विधानसभा मतदारसंघातील जनतेची प्रलंबित मोठ्या संख्येने कामे मार्गी लागली. त्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व युवा नेते डाॅ. सुजय विखे पाटील यांनी पूरक यंत्रणा उभारून गावनिहाय नियोजन केले. त्यामुळे राहाता तालुक्यात हे अभियान यशस्वी झाले, असे प्रतिपादन उपनगराध्यक्ष अभय शेळके यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाच्या सांगताप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते लाभार्थी शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले. नगराध्यक्षा जयश्री थोरात, उपविभागीय अधिकारी माणिकराव आहेर, तहसीलदार अमोल मोरे, नगरसेवक नितीन कोते, सतीश गोंदकर, अमित शेळके, नगरसेविका प्रतीक्षा कोते, सुनीता गोंदकर, वैशाली कोते, छाया सुधीर शिंदे, छाया पोपट शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.
शेळके म्हणाले, सरकारी योजनांचा लाभ सर्व घटकांपर्यंत पोहोचावा यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी देखील पुढाकार घ्यावा अशा सुचना विखे पाटील यांनी दिल्या आहेत. या अभियानात शिर्डी व पंचक्रोशीतील लाभार्थ्यांना चांगला लाभ मिळाला. कार्यलयात हेलपाटे न मारता जागेवर सरकारी कामे मार्गी लागली आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी हा विकासाच्या दृष्टीने अग्रेसर मतदारसंघ आहे. शिर्डी औद्योगिक वसाहतीमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल. त्याचा सर्वाधिक फायदा शिर्डी पंचक्रोशीला होईल. साई थिम पार्क, साई परिक्रमा मार्गाचे विस्तारीकरण व सुशोभिकरण, शिर्डी शहराचे सुशोभिकरण आदी कामे विखे पाटील यांच्या पुढाकारातून मार्गी लागत आहेत. गोदावरी कालवे आणि वितरीकांच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा सर्वाधिक महत्त्वाचा प्रकल्प आहे.
------
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व युवानेते डाॅ.सुजय विखे पाटील यांच्या पुढाकारातून झोपडपट्टीमुक्त शिर्डी हि संकल्पना आकारास येते आहेत. विस्थापितांचे शंभर टक्के पुर्नवसन केले जात आहे. स्वच्छ , हरित व सुंदर शिर्डी यासाठी नियोजनबध्द पावले टाकली जात आहेत.
-अभय शेळके, उपनगराध्यक्ष, शिर्डी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com